सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत अन् पोलिसांचे तांत्रिक कौशल्य
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): स्मार्ट सिटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अन् पोलिसांचे तांत्रिक कौशल्याने रिक्षात विसरलेली अडीच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स महिलेला अवघ्या काही तासात परत मिळाली. शहर पोलिसांच्या सीसीसी (कमांड अँड कंट्रोल सेंटर) विभागातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
बायजीपुरा येथील तहसीन आसिफ शेख या ७ सप्टेंबर रोजी रिक्षात अडीच तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स विसरल्या होत्या. दागिने गहाळ झाल्याने तहसीन यांनी जिन्सी पोलीस
ई चालानवरून शोधला मोबाईल क्रमांक
सीसीटीव्हीतून रिक्षाचा क्रमांक मिळाला, मात्र ऑनलाइन सिस्टिममध्ये मालकाचा मोबाईल क्रमांक नव्हता. अशा वेळी पोलीस अंमलदार चेतन गारदे यांनी शक्कल लढवली. त्यांनी त्या रिक्षावर यापूर्वी झालेल्या एका दंडाच्या पावतीचा (ई-चलान) शोध घेतला. त्या पावतीवर रिक्षामालकाचा मोबाईल नंबर आणि पत्ता पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांचा फोन येताच रिक्षाचालकानेही प्रामाणिकपणे पोलीस आयुक्तालय गाठून ती पर्स पोलिसांच्या हवाली केली. पर्समधील अडीच तोळे सोन्याचे दागिने सुरक्षित मिळाल्याने तहसीन शेख यांनी पोलिसांचे आभार मानले.
ठाण्यात धाव तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांना पोलीस आयुक्तालयातील सीसीसी विभागात पाठवण्यात आले. तेथे महिला पोलीस अंमलदार वर्षा
गोडबोले, मंदा तारू आणि उषा काळे यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. या तपासातून त्यांना संबंधित रिक्षाचा क्रमांक शोधण्यात यश आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















